‘स्वच्छता ही सेवा 2024’ या उपक्रमा अंतर्गत नांदेड रेल्वे स्थानकावर प्रवाशांशी संवाद
भारतीय रेल्वे मध्ये ‘स्वच्छता ही सेवा 2024’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमा अंतर्गत आज दिनांक 21/09/2024 रोजी, श्रीमती नीति सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी हजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस मधील प्रवाशांशी संवाद साधला आणि त्यांना स्वच्छता राखण्यासाठी रेल्वेला मदत करण्याचे आवाहन केले. संवादा दरम्यान त्यांनी प्रवाशांना सांगितले कि ‘स्वच्छ भारताचा प्रवास आपल्यापासून सुरू होतो!’
तसेच या गाडीमध्ये स्वच्छता ठेवणाऱ्या कर्मचार्यांशी हि संवाद साधला, स्वच्छता राखण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची त्यांनी नोंद घेतली आणि त्यांना आणखी सुधारणा करण्यासाठी प्रोत्साहित केले.
यानंतर श्रीमती सरकार यांनी नांदेड रेल्वे स्थानकावरील स्वच्छतेची पाहणी केली आणि संबंधित अधिकार्यांना यात सुधारणा करण्याचे आदेशित केले.
या प्रसंगी श्री रामचंद्र साहू, वरिष्ठ विभागीय पर्यावरण व्यवस्थापक, नांदेड, श्री श्रीनिवास सूर्यवंशी , सहायक वाणिज्य अधिकारी , नांदेड आणि इतर रेल्वे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.