समाजात धर्मांधता वाढली तर तो देश अधोगतीला जातो : प्रसिद्ध साहित्यिक डॉ. संजय मुन यांचे प्रतिपादन

समाजात धर्मांधता वाढली तर तो देश अधोगतीला जातो : प्रसिद्ध साहित्यिक डॉ. संजय मुन यांचे प्रतिपादन

सम्राट अशोकाच्या काळात आपल्या भारताचे क्षेत्र हे तब्बल अफगाणीस्थान पर्यंत होते, परंतु, देशावर धर्मांधतेचे आक्रमणं होत गेली आणि देश हा निमुळता झाला. शिवाय जेंव्हा जेंव्हा या देशावर धर्मांधतेचे अतिक्रमणे होतात तेंव्हा तेंव्हा देश हा निमुळता होत गेला. जर समाजात धर्मांधता वाढली तर तो देश अधोगतीला जातो, त्यामुळे धमार्ंधतेपासून या देशाला वाचवावे लागेल असे प्रतिपादन प्रसिध्द साहित्यीक डॉ. संजय मून यांनी केले.
ते दि. 1 एप्रिल 2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित राज्यस्तरीय जय भीम कवि संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी विचारपीठावर प्रसिध्द साहित्यीक तथा कवि अनंत राऊत, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुशील सुर्यवंशी, प्राचार्य डॉ. राजकुमार म्हस्के, महेंद्र रत्नपारखे, ब्रम्हानंद तायडे, डॉ. रविंद्र काकडे, अरुण जाधव, योगेश रत्नपारखे, विद्याताई रत्नपारखे यांची उपस्थिती होती.
यावेळी कवि अनंत राऊत यांनी त्यांच्या कवितेच्या माध्यमातून तरुणांना प्रेरणा देत मैत्रिचं महत्व पटवून दिलं. यावेळी मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा…, भोंगा वाजला… नेता गाजलाय…, देव म्हणजे काय रे.., यासह विविध कवितेचे सादरीकरण करुन प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. यावेळी त्यांनी प्रबोधन करतांना स्त्री पुरुष समानता, मुलांच्या हाती मोबाईल न देता पुस्तक देणे, तरुणांधी धर्मांधतेकडे जातांना किंवा राजकीय नेत्याच्या मागे जातांना पहिले घरचा विचार करुनच जा असा सल्ला कवि अनंत राऊत यांनी दिला. स्त्री आणि पुरुष लहानपणापासूनच भेद शिकविला जातो, परंतु, पुरुषापेक्षा स्त्री ही तसुभर का होईना श्रेष्ठच आहे असे पटवून दिलं. सध्याच्या परिस्थितीत गावात-खेड्यापाड्यात प्रत्येकजन एकमेकाकडे द्वेषाच्या भावनेने पाहु लागतेत. त्यामुळे त्याला विरोध करण्याची जबाबदारी बाबासाहेंबांनी आपल्या बहुजनाकडे दिलीय. असंही अनंत राऊत यांनी यावेळी म्हटलं.
यावेळी प्राचार्य राजकुमार म्हस्के व इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तर कवि विदोन जैतमाल, सुहास पोतदार, गणेश शेळके, अच्युत मोरे, रेखा गतखने, राज रणधीर यांच्यासह निमंत्रीत कविंनी आपल्या कवितेचे सादरीकरण केलं. या कविसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी विद्याताई रत्नपारखे, महेंद्र बनकर, पांडुरंग हिवाळे, बबन मगरे, हरिष रत्नपारखे, भगवान धाबे, भास्कर साळवे, ऍड. जी. व्ही. घोडे, सुशील आदमाने, स्वप्निल रत्नपारखे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी सुहास पोतदार व भास्कर साळवे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार गंगाधर आदमाणे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *