भव्य रक्तदान शिबीर एक सामाजिक उपक्रम

भव्य रक्तदान शिबीर एक सामाजिक उपक्रम

वर्ष 6 वे
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सावनिमित्त, महाराष्ट्र जिल्हापरिषद मागासवर्गीय शिक्षक संघटना जिल्हा शाखा -जालना यांच्या वतीने 14 एप्रिल 2024 ला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण गत 5 वर्षांपासून एक सामाजिक जबाबदारी म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहोत. आपल्या एका रक्तदानामुळे किमान 3/4 जणांना जीवनदान मिळू शकते.तरी, सर्व सन्माननीय अधिकारी,सर्व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, शिक्षक बंधू, भगिनी, सामाजिक कार्यकर्ते, जिल्ह्यातील सर्व सुज्ञ नागरिक यांना या द्वारे नम्र आवाहन करण्यात येत आहे की आपण या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडवी.

रक्तदान शिबीर दिनांक – 14 एप्रिल 2024 वार – रविवार
ठिकाण -जालना-बदनापूर जि.प.शिक्षक सहकारी पतसंस्था. भाग्य नगर, जालना.
वेळ- सकाळी 8.00 ते दुपारी 2.00

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *