संविधानाचा सम्मान करणारे सरकार येणे गरजेचे आहे -डॉ भीमराव य आंबेडकर

लोकशाही, संविधान टीकविण्यासाठी काम करावे
-डॉ हरीश रावलिया

आपल्या मतांचा भ्रस्टाचार करू नका
-अँड सुभाष जौंजाळे

पुणे ( दि.7/4/2024)-डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली धम्मक्रांती ही जगामधील अद्वितीय क्रांती आहे इतर क्रांत्या रक्त रणजित आहे,धम्म क्रांती ही दि बुद्धिस्ट सोसायटीच्या वतीने केली, धम्म पुस्तक नाही त्यामुळे बाबासाहेब बुद्ध आणि त्यांचा धम्म 1951 पासून लिहीत होते , त्यांनी सर्व व्यवस्था केली, त्यांनी सायंटिफिक धम्म सांगितला , बुद्धानंतर धम्मात भेसळ झाले परंतु त्याचे शुद्धीकरण करून त्यांनी पुस्तकं लिहिले.गायक, श्रीलंका भिक्खू यांना बोलावून गाथाला चाल लावून दयावी,ते स्वतः व्हायलान शिकले, पूजापाठ कसे असावेत याबाबत चर्चा केली. त्यानंतर भय्यासाहेब यांनी काम केले सर्व खेड्यात जाऊन धम्म दिक्षा कार्यक्रम केले ,तेवढ्यावरच ते थांबले नाहीत त्यांनी धर्मांतरित बौद्ध समाजाला शासकीय सवलती मिळवून दिल्या.त्यामुळे महाराष्ट्रातील बौद्ध समाज स्वाभिमानाने जगत आहे.
धम्म कार्यात अनेक अडचणी येतात त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावे लागेल, बाबासाहेबांची धम्म क्रांती गतिमान करावी लागेल. 2014 पासून प्रतीक्रांती सुरु आहे, या प्रतीक्रांतीला थांबवायचे असेल तर आपल्याला विचारांची क्रांती करावी लागेल, संविधानाचा सम्मान करणारे सरकार येणे गरजेचे आहे. 2024 च्या निवडणुकीत संविधानाला मानणारी वंचित बहुजन आघाडी व इंडिया आघाडीला मतदान करावे असे आवाहन डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे अध्यक्ष डॉ भीमराव य आंबेडकर यांनी पुणे शहर जिल्हा शाखेच्या झोन क्र 5 च्यावतीने साने गुरुजी स्मारक, सिंहगड रोड, कोथरूड, पुणे येथे दि 7/4/2024 रोजी आयोजित केलेल्या धम्म परिषदेत केले.
यावेळी संस्थेचे ट्रस्टी चेअरमन डॉ हरीश रावलिया यांनी मनुस्मृती पुन्हा लागू करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत त्यामुळे लोकशाही, संविधान टीकविण्यासाठी काम करावे लागेल असे आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
व रिपोर्टींग ट्रस्टी चेअरमन अँड सुभाष जौंजाळे यांनी धम्माची वाढ होण्यासाठी पंचशीलाचे पालन होणे गरजेचे असून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या म्हणण्यानुसार आपल्या मतांचा भ्रस्टाचार करू नका म्हणजे पैसे घेऊन मतदान करू नका असे प्रतिपादन केले.राष्ट्रीय उपाध्यक्ष व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर एस के भंडारे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती गतिमान कशी करावी? या विषयावर आणि राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड गुरुजी व केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख अँड डॉ एस एस वानखडे यांनी बौद्ध धम्माची खास वैशिष्ठ याविषयावर मार्गदर्शन केले. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी झोन 5चे अध्यक्ष जगन्नाथ मेश्राम होते. प्रास्ताविक पुणे शहर जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ नागदेवते आणि सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस अँड सुधाकर सरदार यांनी केले. या धम्म परिषदेस ट्रस्टी डॉ राजाराम बडगे,पुणे जिल्ह्यातील अरुण सोनवणे, राजरतन थोरात, राधाकांत कांबळे, सुनीताताई रोकडे,समता सैनिक दलाचे पी एस ढोबळे, किरण आल्हाट, अनिल कांबळे, शुभांगी लोंढे इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *